राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. 1ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल’ अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करता येते. दि. 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू होती. परंतु राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्याना ई-पीक नोंदणी करता आली नाही.
यामुळे शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये यासाठी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहायक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार आहे. ही माहिती राज्य संचालक, महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या पत्राने सर्व विभागस्तरावर प्रसारित करण्यात आलेली आहे.
सहायक स्तरावरील ई-पीक पाहणीस मुदतवाढ-
2025 च्या खरीप हंगामाची 1 ऑगस्ट ते १४ सप्टेंबर 2025 या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करणे गरजेचे होते. परंतु आता 20 सप्टेंबरपर्यंत शेतकरी मोबाईल ॲपद्वारे पिक पाहणी करू शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे, त्यासाठी आता 21 सप्टेंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या अगोदर सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित केला गेलेला होता.
ई-पीक पाहणी हमीभाव खरेदीसाठी बंधनकारक-
राज्यातील पणन विभागाने हमीभाव खरेदीसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे. शेतकऱ्यांनी जर ई-पीक पाहणी केलेली नसेल तर सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांची हमीभाव केंद्रावरती विक्री करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर पीक विमा, पीक कर्ज, अनुदान वाटप यासाठी पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.