महायुती शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे. राज्यातील लाखो पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास दहा दिवस झाले तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले होते. यादरम्यान राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे.
आदितीताई तटकरे यांनी पोस्ट शेअर करत लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबद्दलची माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून म्हणजेच (ता. 11 सप्टेंबर) पासून वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे जमा होतील.
आदितीताई तटकरे काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आज पासून म्हणजेच (ता.11 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासामुळे सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित केला जाणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.