प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योननेच्या विसाव्या हप्त्याबरोबर राज्य शासनाकडून दिला जाणारा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातवा हप्ता हा एक महिन्यानंतर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी शासनाने 1 हजार 932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेली आहे. या हप्त्याचे वितरण येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 92.91 लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रती शेतकरी 6 हजार रुपये देण्यात येतात.
या अनुदानामध्ये आता राज्य शासनाने आणखी 6 हजार रुपयांची भर घालून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच हा हप्ता देण्यात येतो. केंद्र सरकारच्या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच याचा लाभ दिला जातो. केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आलेला आहे. त्याच वेळी नमो सन्माननिधी योजनेचा हप्ता मिळणे अपेक्षित होते. परंतु राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भारामुळे निधी मिळण्यास अडचण निर्माण झाल्यामुळे हप्ता देण्यात आलेला नव्हता, असे सूत्रांचे म्हणणे होते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आलेले आहे व एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता आता दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने 1 हजार 932 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. पीएम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण 92.91 लाख शेतकरी पात्र ठरलेले होते. याच शेतकऱ्यांना हा 2 हजार रुपयांचा नमोचा हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.