राज्यातील कोणत्या विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा झालेला आहे?

राज्यातील पावसाचा जोर बुधवारी ओसरलेला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश जलसाठे ओव्हरफ्लो झालेले आहेत. राज्यामध्ये 1 जून पासून 20 ऑगस्टपर्यंत पडणाऱ्या सामान्य पावसापेक्षा 7 टक्के अधिक पाऊस झाला आहे. दोन दिवसात 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठ्यामध्ये 2.30% वाढ झालेली आहे. त्याचबरोबर धरणे ही 90% भरलेली आहेत. धरणामधून विसर्ग सुरू केल्यामुळे पंचगंगा, कोयना, कृष्णा, गोदावरी, चंद्रभागा, निरा, प्रवरा, गिरणा, भीमा, मुळा-मुठा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गतवर्षाच्या तुलनेमध्ये नागपूर विभागात अद्याप जलसाठ्यामध्ये 10 टक्के कमतरता दिसून येत आहे.

विभागनिहाय मोठी धरणे जलसाठा-

  • नागपूर: 16-67%
  • नाशिक: 22-83%
  • अमरावती: 10-85%
  • छत्रपती संभाजीनगर: 44-89%
  • पुणे: 35-95%
  • कोकण: 11-95%

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *