आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता, अर्ज छाननी प्रक्रिया, अपात्रतेची कारणे याबद्दलची माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये 1500 थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. महिला व बालविकास मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनानुसार 2025 मध्ये काही नियम बदलण्यात आलेले आहेत.
सदर योजनेच्या अर्जाची छाननी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना –
- नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे वय हे दि.01-07-2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थीस अपात्र करण्यात येणार आहे.
- वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे वय हे दि.30-09-2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थीस अपात्र करण्यात येणार आहे.
- लाभार्थ्यांचे वय हे दि.01-08-2025 रोजी 65 पेक्षा जास्त असते तर त्या लाभार्थीस अपात्र करण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करत असताना त्यांनी आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्रे अपलोड केलेले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी. (वयाचा पुरावा तपासत असताना फक्त आधार तपासू नये. तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात यावे.)
- कुटुंबात (एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब) 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपसावे व त्यातील किती महिला या योजनेत लाभ घेत आहेत हे तपासावे.
- शासन निर्णयानुसार एक कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे, असे नमूद केलेले आहे.
- एक कुटुंबात एक विवाहित व एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्यास कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र करावे.
- लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असेल तर जुन्या रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य धरावी.
- या योजनेचा लाभ जर कुटुंबात 2 विवाहित महिला घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र असणार आहे. उदा. कुटुंबातील सासू व सूल अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. तसेच कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहिण ही अपात्र ठरणार आहे.
- लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू असणार आहेत.
- लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी. (एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही तर त्या लाभार्थ्यास अपात्र करण्यात येणार आहे.
सदर योजनेची अर्ज छाननी प्रक्रिया-
- जिल्हास्तरावर अर्जांचे संगणकीकृत परीक्षण करण्यात येणार आहे.
- कुटुंबातील सदस्यांची पडताळणी
- उत्पन्न व वय तपासणी
- अपात्र लाभार्थ्यांना एसएमएस/पोर्टलद्वारे कळवणे.
सदर योजनेचा अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून-
- तुमचे नाव रेशन कार्डमध्ये योग्य प्रकारे नोंदवले आहे की नाही याची खात्री करावी.
- वयाचे पुरावे (जन्म दाखला/आधार अपडेट ठेवावे)
- उत्पन्न प्रमाणपत्र वेळेवर नूतनीकरण करावे.
- कुटुंबातील सदस्य आधीच लाभ घेत आहेत का हे तपासावे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.