जर तुमच्या वारसांच्या नावाने जमिनीची नोंद सापडली तर ती जमीन नावावर होऊ शकते का?

चालू घडीला प्रत्येकाला आपल्याकडे शेती किंवा जमीन असावी, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे जमिनीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. जर तुमच्याकडे जमीन नाही किंवा त्याबाबत तुम्हाला माहिती नाही, परंतु जर या जमिनीच्या बाबत एखादी नोंद सापडली तर ती तुमच्या नावे सातबाऱ्यावर येऊ शकते का? तर हो, हे शक्य आहे. ते कसे चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया.

एखाद्या जमिनीवरती कूळ म्हणून 01 एप्रिल 1957 ला जर का तुमच्या वडिलांच्या, आजोबांच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर एखाद्या जमिनीची नोंद लागलेली असेल, तर त्याच दिवशी तुम्ही त्या जमिनीचे मालक झालेले असतात. परंतु फक्त कार्यालयीन प्रक्रिया कायद्यानुसार पूर्ण करणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्ही वारस या नात्याने ती जमीन परत मिळू शकतात. कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कलम 32 (ग) ची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याला कलम 32 (म) नुसार प्रमाणपत्र प्राप्त होते. ते प्रमाणपत्र हे तुमच्या नावाने जमीन ट्रान्सफर झाल्याचे प्रमाणपत्र असते. हे प्रमाणपत्र तुम्ही तलाठ्याला सर्कलला दाखवून सातबाऱ्यावर तुमच्या नावाने त्या जमिनीची नोंद करून घेऊ शकता व जमिनीचे मालक होऊ शकतात.

काय आहे कलम 32 (ग)-

कलम 32 (ग) हा मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 मधील एक महत्त्वाचा भाग आहे. कृषक दिनी (1 एप्रिल 1957) या कलमच्या माध्यमातून कुळांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. जर कुळाने या दिवशी जमीन खरेदी केली असेल, तर ती जमीन त्यांच्या मालकीची मानण्यात येते व सातबारावर त्याच्या नावावर नोंद होते. ज्या कुळांना त्यावेळी हे शक्य झाले नाही, ते आजही कलम 32 (ग) नुसार अर्ज करून जमिनी खरेदी करू शकतात.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *