पीएम किसान योजनेच्या विसाव्या हफ्त्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवर मेसेज आलेला आहे. तर काहींना मेसेज आलेला नाही म्हणून त्यांनी बँकेच्या नंबरवरती मिस्ड कॉल देऊन पैशांबाबत शिल्लक तपासलेली असेल. परंतु जर तुम्हाला अजूनही माहिती नसेल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही, तर एक सोपा उपाय आहे. फार्मर आयडी कार्डच्या मदतीने पीएम किसान योजनेचे स्टेटस तुम्हाला जाणून घेता येणार आहे. शेतकरी आयडीच्या मदतीने स्थिती तपासण्याची पद्धत खास आहे, चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
शेतकरी आयडी वापरून पीएम किसान स्टेटस कसे तपसावे?-
- सर्वात अगोदर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- होमपेजवरील ‘लाभार्थी स्टेट्स या पर्यायामध्ये जावे व त्यातील स्थिती जाणून घ्यावी. ती तुम्हाला ‘फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून मिळणार आहे.
- त्यानंतर नोंदणी क्रमांक हा पर्याय शोधावा. त्यामध्ये कॅप्चा कोड टाकावा.
- पुढे गेट ओटीपी या बटणावर क्लिक करावे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तो टाकावा.
- आता स्क्रीनवरती पीएम किसानची स्थिती, पेमेंट तपशील दिसणार आहे.
- या पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.