सामायिक शेतजमिनीची विक्री करता येते का? कायदा काय सांगतो?

एखादी मालमत्ता सामायिक असते किंवा त्या मालमत्तेवरती एकापेक्षा जास्त लोकांची नावे असतात, तेव्हा काही कायदेशीर प्रश्न निर्माण होत असतात. काही वेळा ही मालमत्ता एकाच कुटुंबातील व्यक्तींची असते, तर काही वेळा त्यात इतर व्यक्तीही असतात. यासंदर्भात वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. समजा एखाद्या सामायिक मालमत्तेमध्ये तुमचा हिस्सा तुम्हाला विकायचा आहे, पण त्यावेळी इतरांनाही त्यांचा हिस्सा विकायचा आहे. म्हणजेच त्या मालमत्तेचे मालक असलेल्या सगळ्यांनाच आपला हिस्सा विकायचा आहे किंवा त्यांची एकत्रित विक्री करायची आहे तर कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय ते ही मालमत्ता विकू शकतात तसेच त्याची विल्हेवाट लावणेही सोपे जाते. परंतु, इतर सहहिस्सेदार आपला हिस्सा विकायला तयार नसतील तर मात्र काही कायदेशीर गोष्टी उभ्दवतात.

कारण मालमत्तेवरती ‘सामायिक’ हक्क असल्यामुळे कोणाचा हिस्सा किती हे निश्चित सांगता येत नाही व त्याचे सरस-निरस वाटप झालेले नसते. सहहिस्सेदाराकडूनच त्याचा हिस्सा विकत घ्यायचा असेल तर समान अविभाजित हक्क व हिस्सा असा उल्लेख खरेदीखतात करावा लागतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामायिक मालमत्तेवरती आपला हिस्सा एखाद्याला विकायचा असेल तर तो विकत घेण्याचा प्राधान्याचा हक्क/पहिला संधी बाकीच्या सहहिस्सेदारांना असते. सहहिस्सेदार कुटुंबातला नसेल तर त्याने अगोदरच आपला हिस्सा वेगळा करून घेणे सोयस्कर असते. त्यामुळे वाटपाचा दावा दाखल करून आपला हिस्सा स्वतंत्र करावा.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *