आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल 1500 रुपये जमा झालेले आहेत. ज्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करू नका कारण आदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या देखील खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे हे 9 ऑगस्टपर्यंत जमा होणार आहेत. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाहीत? हे कसे पाहावे, याबद्दल आपण सदर लेखातून जाणून घेऊयात.
पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही? कसे चेक करावे?-
- बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही? हे विचारू शकता.
- त्याचबरोबर ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत की नाही? हे पाहता येते.
- जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला एसएमएस येतो. तो एसएमएस आला आहे की नाही हे पहावे.
- जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग सेवेचा वापर करत नसाल तर प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही? हे पाहू शकता.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.