‘या’ मोहिमेच्या माध्यमातून सातबाराऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवता येणार?

शेतकऱ्यांच्या भवितव्याची हमी म्हणजे जमिनीवरील हक्कांची पारदर्शकता आहे. महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की, 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीचा अपाक (अज्ञान पालक कर्ता) शेरा ठेवू नये. महसूल विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या जिवंत 7/12 मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळली जाणार आहेत व 7/12 उतारे अद्यावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. खातेदारांच्या वयाचा पुरावा तपासून ई-हक्कप्रणालीतून अपाक शेरा कमी केला जाणार आहे. जन्म-मृत्यू रजिस्टरच्या नोंदीवर आधारित तपासणी करून अद्यावत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी वयाचा पुरावा तहसील कार्यालयात सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

अ.पा.क.शेरा म्हणजे काय?-

एखाद्या जमिनीवरती नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी एखादी व्यक्ती कायद्याने अज्ञान म्हणजे १८ वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव 7/12 उताऱ्यावर लावले जाते. अज्ञान व्यक्तीचे वय पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक कर्ता व्यक्तीचे नाव 7/12 वरून कमी केले जाते. याला अ.पा.क शेरा कमी करणे असे म्हणतात.

अ.पा.क शेरा कमी करण्यासाठी व नोंद करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती-

  • ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/मृत व्यक्तीचे नाव)
  • संपूर्ण नाव
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल (असल्यास)
  • अज्ञान खातेदाराची जन्मतारीख

खालील कागदपत्रे जोडणे गरजेचे-

  • खातेदाराच्या वयाचा पुरावा जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
  • ओळखपत्र

संपर्क-

शेतकऱ्यांच्या हक्कांमध्ये पारदर्शकता ही आमची प्राथमिकता असल्यामुळे वेळेत अपाक शेरा हटवणे हेच वाद टाळण्याचे मुख्य पाऊल आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या व 7/12 वर अपाक शेरा असणाऱ्या व्यक्तींनी वयाचा पुरावा घेऊन तलाठ्यांशी संपर्क करावा व अपाक शेरा हटवून नोंद लावून घ्यावी.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *