जुलै महिना संपला तरी सुध्दा राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा हप्ता कधी येणार? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झालेले होती. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट देण्यात येणार आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जमा केला जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्माननिधी (1500 रुपये) वितरित केले जाणार आहेत. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींना सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे. जुलै महिना संपला तरी सन्मान निधी खात्यात जमा नाही झाल्यामुळे जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा होती. परंतु आता फक्त जुलै महिन्याचेच पैसे रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला पात्र लाडक्या बहिनींणा मिळणार आहेत, हे स्पष्ट झालेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.