शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात आलेले आहे. मागील काही दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. देशभरातील साडेनऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत, त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवरती एसएमएस येतो. जर काही कारणामुळे एसएमएस आला नसेल तर खाली देण्यातआलेल्या पध्दतीने चेक करावे.
असे चेक करा हफ्ता जमा झाला की नाही-
- हफ्ता जमा झाला की नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर पीएम किसान योजनेचा pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यातील फ़ार्मर कॉर्नरमध्ये जाऊन बेनिफिशियर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून आपल्या हप्त्याचे स्टेटस पाहता येते.
- जर स्टेटसमध्ये ई-केवायसी, लँड सीडींग व आधार बँक सीडींग या तिन्ही ठिकाणी Yes असे असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे.
नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.