शेतकऱ्यांनी सुधारित पिक विमा योजनेकडे पाठ फिरवल्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलेले आहे. त्यामुळे शासनाने पिक विमा योजनेमध्ये सहभागाची तारीख वाढवून 14 ऑगस्ट केलेली आहे. तसेच शासनाने उरलेल्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केलेले आहे. शासनाच्या माध्यमातून 2022 पासून राबवण्यात येणाऱ्या पिक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून उत्पादनावर आधारित व 80:110 या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या योजनेची अंतिम मुदत ही 31 जुलै पर्यंत होती. परंतु शेतकऱ्यांना या योजनेतील जाचक अटींमुळे या योजनेकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. या सुधारित पीक विमा योजनेमध्ये अतिशय कमी सहभाग नोंदवल्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्यात आलेली आहे. आता 14 ऑगस्टपर्यंत सहभाग शेतकऱ्यांना नोंदवता येणार आहे. ही मुदत वाढवल्यानंतर देखील किती शेतकरी सहभागी घेतील याची काही गॅरंटी नाही. परंतु सरकारकडून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
सदर योजनेचे महत्त्वाचे मुद्दे-
- या योजनेच्या माध्यमातून सहभागासाठी अंतिम मुदत ही दि.14 ऑगस्ट 2025 आहे.
- या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात.
- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे.
- ई-पीक पाहणी व विमा घेतलेले पिक यामध्ये तफावत आढळून आली तर विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.