ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उताऱ्यावरती शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प हा दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून राबवला जात आहे. संपूर्ण राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पामध्ये सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे लागू करण्यात आलेली आहे. गुगल प्ले स्टोअरवरती खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे व्हर्जन अद्यावत स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून घ्यावे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे. तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तेवढी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. जर पीक पाहणी करत असताना काही अडचण आली तर आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकाची शेतकऱ्यांनी मदत घ्यावी. तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी खरीप 2025 ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीमध्ये पूर्ण करावी.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.