आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे व यासंदर्भात GR जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर या योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता जास्तीत जास्त येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये जमा होणार आहे. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्याच महिलांना जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे.
जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 रुपये लाभ दिला जातो. तर ज्या पात्र लाभार्थी शेतकरी महिलांना पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचे वितरण करण्यासाठी 28290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वर्ग करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या आठ ते दहा दिवसात जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून 13वा हप्ता मिळणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.