शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदती 31 जुलै ही आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्यामार्फत पीकविमा योजना राबवण्यात येते.
खरीप हंगामामधील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका, कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्याचबरोबर या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये या योजनेमध्ये सहभाग ऐच्छिक आहे. अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, सात-बारा, बॅंक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज भरून सहभाग घ्यावा.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.