प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत देण्यात येते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत व या योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या हप्ताबाबत विचारणा करण्यात येत होती. या अगोदर अनेक तारखांचा अंदाज देखील लावण्यात आलेला होता. पण त्यातील एकही तारीख निश्चित ठरलेले नाही.
परंतु पुन्हा एक नवीन तारीख समोर आलेली आहे. यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हे 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसानचा 20वा हप्ता जारी करणार आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी उत्तर प्रदेश दौऱ्यावरती आहेत व त्यांचा वाराणसीमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे. उत्तर प्रदेशासाठी या दिवशी पंतप्रधान यांच्या मार्फत अनेक मोठ्या घोषणा करण्यात येऊ शकतात. याच वाराणसी दौऱ्यातून पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.