महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी यादी ही 25 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करायची आहेत. त्याचबरोबर संबंधित जिल्हानिहाय आपल्याला यादी पाहता येणार आहे. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. या ऑनलाईन प्राप्त अर्जांमधून महाडीबीटी पोर्टलवर सोडत जाहीर करण्यात येते. कृषी यांत्रिकीकरण सोडत कृषी यादीमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कर्टर इत्यादी अनेक कृषी अवजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
महाडीबीटी सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व टेस्ट रीपोर्ट तसेच ट्रॅक्टर चलित अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करायचे आहे. त्यानंतर पूर्वसंमती व पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटीमध्ये आहेत. ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या व्यक्तीच्या नावे नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाणे असणे गरजेचे आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई वडील व त्यांचे अविवाहित अपत्य)
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.