राज्य शासनाच्या माध्यमातून जून महिन्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची त्याचबरोबर अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेली आहे. 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती लाभ हस्तांतरित केलेला आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित केलेला आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर करण्यात आलेली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत त्याचबरोबर काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा तात्पुरत्या स्वरूपात लाभ थांबवण्यात आलेला आहे.
याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित केलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा केली जाणार आहे व त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरणार आहेत, त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू केला जाणार आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून शासन स्तरावर योग्य निर्णय घेतला जाणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.