शासनाकडून पीएम किसान व नमो सन्मान योजनेमध्ये नवीन नोंदणी करण्यासाठी काही नियम घालण्यात आलेले आहेत. यामध्ये नवीन शेतजमीन खरेदी केली असेल तर त्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का? पीएम किसान योजनेच्या नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर न जमीन खरेदी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करत असताना पती-पत्नी व मुलांची आधारकार्ड जोडावी लागणार आहेत. पीएम किसान योजना ही केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही नमो सन्मान योजना राबवली जाते. या योजनेतून 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनांचा लाभ शेतकरी म्हणून कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी एकालाच व 2019 च्या अगोदर जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलाला घेता येतो. परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावर 2019 नंतर जमिनीची नोंदणी झालेली आहे. पत्नीच्या नावावर माहेरची जमीन म्हणूनही काही दांपत्ये योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाचा निदर्शनास आलेले आहे. नवीन नियमानुसार पात्र लाभार्थ्याचे निधन झाल्यावरती वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र असणार आहे. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नसेल व कर भरत नसेल तरच लाभ दिला जाणार आहे.
शेती बाबतीत या कारणामुळे शेतकरी ठरत आहेत अपात्र?-
- जमीन विक्रीमुळे भूमीहीन झालेले शेतकरी.
- अगोदर कुटुंब प्रमुखास लाभ मिळत आहे.
- संस्था मालकी असलेला जमीनधारक
- 1 फेब्रुवारी 2019 नंतरचा जमीनधारक
- जमिनीची मालकी स्वतःच्या नावे नसलेले जमीनधारक
- शेती शिवाय इतर कारणासाठी ती जमीन वापरणारे जमीनधारक
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.