शेतकरी मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यांमधील शेतकऱ्यांना परत प्रतीक्षाच करावी लागणार आहे, असे चित्र दिसून येत आहे. कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात फक्त चर्चे व्यतिरिक्त काहीच न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पदरी निराशाच पडलेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आलेले आहे. जवळपास वीस दिवस चाललेल्या या अधिवेशनात फक्त सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये हेवेदावे झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी थोडक्यात मत व्यक्त केलेले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते व ते पूर्ण करणारच आहोत. परंतु कर्जमाफी हा तात्कालीक उपाय आहे. कोणत्याच राज्याला दर पाच वर्षांनी कर्जमाफी देता येऊ शकत नाही. परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत नवीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अॅड. राहुल नार्वेकर यांच्यामार्फ़त घोषना करण्यात आलेली आहे की, विधानसभेचे पुढील अधिवेशन नागपूर येथे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

