राज्यभरात डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाच्या माध्यमातून रब्बी 2024-25 व उन्हाळी 2024-25 हंगामापासून प्रक्रिया ही सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्यासाठी हंगामाचा सुरुवातीचा 45 दिवसांचा कालावधी उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर उरलेल्या खातेदारांची ई-पीक पाहणी नोंद करण्यासाठी सहायक स्तरावर 45 दिवसांचा कालावधी मोबाईलअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य हे पारंपारिक खरीप राज्य आहे व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येते. त्यामुळे खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदवताना मोबाईल अॅपवरती भार येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
या अनुषंगाने भार क्षमतेची चाचणी, ई-पिक पाहणी प्रणालीची कार्यक्षमतेच्या व अनुषांगिक इतर तांत्रिक चाचण्या करण्यासाठी 10 दिवसांचा डाऊनटाईम घेणे गरजेचे आहे. खरीप हंगाम 2025 ची राज्यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरवात होणार आहे. परंतु त्या अगोदर काही तांत्रिक चाचण्या करण्यासाठी दिनांक 21 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 दहा दिवस मोबाईल अॅप बंद ठेवण्यात आलेला आहे. याबाबत आपल्या अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

