शेतकरी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतच्या अनेकदा तारखांचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्या अगोदर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे. पीएम किसान योजनेच्या 20 हप्त्याचे वितरण आज होईल, उद्या होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पीएम नरेंद्र मोदी यांच्या बिहार येथील कार्यक्रमामधून या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु असे काही झाले नाही. याबाबत 18, 19, 20 जुलैपर्यंत हा हफ्ता वितरित होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. अशातच केंद्रीय कृषिमंत्रालयाकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांना नेमके काय आवाहन करण्यात आलेले आहे-
शेतकरी बंधू व भगिनींनो, सोशल मीडियावरती पीएम किसान योजनेच्या नावाखाली पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावधान रहावे. सध्या अनेक शेतकऱ्यांना बनावट लिंक, कॉल्स, मॅसेज येत आहेत, अशा खोट्या गोष्टीपासून सावध राहावे, असे आवाहन केले जात आहे. 20वा हप्ता व इतर माहिती ही फक्त pmkisan.gov.in व @pmkisanofficial या वरुन देण्यात येणार आहे, अशी सूचना करण्यात आलेली आहे.
सोशल मीडियावरती पीएम किसान योजनेच्या नावाचा वापर करुन खोटी माहिती व बनावट संदेश पसरवले जात आहेत. शेतकरी बांधवांनो, खोट्या अफवांपासून दूर रहा. फक्त पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती याबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिवाय लवकरच पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत घोषणा करण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

