आता पशुपालनासाठी देखील मिळणार शेतीप्रमाणे कर्ज व विमा!

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यामुळे राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या धोरणाच्या सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे व त्यांना नवीन सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

पशुपालकांच्या उत्पादनात होणारा वाढ-

  • कृषीप्रमाणे पशुपालन व्यवसायासाठी कर्जवरील व्याज दरात सवलत, पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलर संच उभारण्यासाठी सवलत दिली जाणार आहे.
  • याशिवाय ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्यासाठी कृषी व्यवसाय दराने कर आकारणी करण्यात येणार आहे.
  • या निर्णयामुळे शाश्वत शेतीला चालना मिळणार आहे व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढणार आहे.  

पशुपालनामध्ये कोणत्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे-

दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांप्रमाणेच कर्ज व विमाही मिळणार!-

शेतीसाठी ज्याप्रमाणे शासनाच्या कर्ज व विमा योजना आहेत, त्याप्रमाणेच या व्यवसायासाठी या योजना राबवल्या जाणार आहेत.

थेट लाभ कोणाला?-

25,000 मांसल कुक्कुट पक्षी, 50,000 अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच 45,000 क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी, 100 दुधाळ जनावरांचे संगोपन, 500 मेंढी, शेळीपालन व 200 वराह या दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन शेळीपालन व वराहपालन व्यवसायिकांना याचा लाभ होणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *