आज आपण सदर लेखातून विधानसभेमधील लक्षवेधी घोषणाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
- विद्यार्थी अपघात विमा योजना; नुकसान भरपाई जलद देणार- शालेय शिक्षणमंत्री दादाजी भोसे
- अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही- शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
- राज्यामध्ये नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, 50 लाख कुटुंबांना लाभ होणार
- विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावरती बिलामध्ये 10 टक्के सवलत मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ऑनलाईन गेम्सवरती विनियमनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे- राज्यमंत्री पंकज भोयर
- अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा- कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे
- पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री अॅड. अशिष जयस्वाल
- जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी बार्टीमार्फत डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध- टोल फ्री क्रमांक: 1800 120 8040, व्हॉट्सअॅप हेल्पडेस्क नंबर: 9404999452, ई-मेल: helpdesk@barti.in
- राज्यात सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर आकारणीबाबत सर्वेक्षण केले जाणार- मंत्री उदय सामंत
- भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्यात येणार– मंत्री उदय सामंत
नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group
Join Now