लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आज पासून जमा होण्यास सुरुवात?

आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहीणींची जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्डबँक खात्यामध्ये आजपासून हा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती ट्विट करत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

तसेच त्यांनी ट्विट करत असे देखील म्हटले आहे, की महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाली यापुढेही अशीच सुरू राहणार आहे, हा मला विश्वास आहे.

बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही कसे तपासावे?-

  • लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले असल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस येईल.
  • बँकेकडून एसएमएस नसेल आला तर तुम्ही तुमच्या बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावरती एसएमएस पाठवू शकता किंवा टोल फ्री क्रमांकवरती मिस्ड कॉल करून देखील तुम्ही तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या बाबतीमध्ये जाणून घेऊ शकता.
  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेट बँकिंग, गुगल पे किंवा फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
  • डेबिट कार्ड असेल तर एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
  • तसेच बँकेमध्ये जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत की नाही हे पाहू शकता.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *