चालू घडीला नागरिकांच्या आयुष्यामधील आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनलेले आहे. प्रत्येक गोष्टीला आधार कार्डची गरज भासत असते. शेतकऱ्यांना देखील अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सक्तीचे करण्यात आलेले आहे. जर आधार कार्ड शेतकऱ्याच्या बँक खात्याला लिंक नसेल तर कोणत्याच योजनेचे पैसे शेतकऱ्याला मिळणार नाहीत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया आधार कार्ड बँकला लिंक असणे का गरजेचे आहे?
जर शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर त्याचे अनुदान बंद होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते आधारशी लिंक करणे हे आहे. जर बँक खाते व आधार कार्ड एकमेकांशी जोडले नाही तर अनुदान मिळणे बंद होऊ शकते. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डमध्ये आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगण्यात आलेली आहे. जर आधार कार्डशिवाय बँक खात्याची माहिती देण्यात आलेली असेल तर अनुदानाचा लाभ मिळणे बंद होऊ शकते.
शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ हा डीबीटीद्वारे देण्यात येतो. यामध्ये अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तंतरित करण्यात येतात. तर बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर त्या खात्यात पैसे हस्तांतरीत केले जाणार नाहीत. हे पाऊल कृषी विभागांनी शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून लवकर पैसे देता यावेत व त्यात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी उचललेले आहे.
बँकेला आधार लिंक कसे करावे?-
- आधार कार्ड बँकेला लिंक करण्याची सोपी पद्धत आहे. शेतकऱ्याला त्याचे आधार कार्ड व पासबुक घेऊन बँकेमध्ये जाऊन लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
- ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्म वापरुन देखील तुम्ही आधार लिंक करू शकता.
- लिंक केल्यानंतर अपडेट केलेली माहिती कृषी कार्ड डेटाबेसमध्ये अपडेट करणे गरजेचे आहे. एकतर अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी पोर्टलच्या मार्फत किंवा सीएससी केंद्रांना भेट देऊन हे करता येणार आहे.
- हे तपशील अपडेट नाही केले तर शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळणार नाही व ते अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.