सोलर पॅनल तुटले असेल तर अर्ज कसा करावा?

राज्यांमध्ये मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांनी व अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनल खाली पडलेले आहेत. विशेषत: विहिरी व बोअरवेलवर बसवलेले सोलार पंपसेट मोठ्या प्रमाणात तुटले, वाकले किंवा खाली पडलेले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना पुन्हा वीज किंवा पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना या नुकसानीबद्दल भरपाई मिळणार आहे. फक्त त्यासाठी योग्य ठिकाणी अर्ज करण्याची गरज आहे. मे महिन्याच्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवर बसवलेले सोलर पॅनल्स मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झालेले आहेत.

परंतु अशावेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाईन किंवा महावितरण तर्फे अर्ज सादर करावा. शासनाच्या योजनेनुसार पाच वर्ष मोफत याची देखभाल व दुरुस्तीची हमी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्री पॅनल तुटले असतील तरी भरपाई किंवा दुरुस्ती शक्य होणार आहे. सोलार पंपशक्तीमुळे शेतकऱ्यांनी वीज संकटावर मात केलेली आहे. पण नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर योग्य प्रकारे व योग्य वेळी अर्ज केला तर सरकारच्या योजनांमधून पूर्ण दुरुस्ती किंवा भरपाई मिळवता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलेले आहे.

भरपाईसाठी अर्ज कोठे करावा?-

सोलार पॅनलचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खालील दोन मार्गांनी अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज-

‘कुसुम योजना’ किंवा ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती संबंधित कंपनीकडे देखभाल दुरुस्ती करता ऑनलाईन तक्रार करता येणार आहे.

ऑफलाईन अर्ज-

आपल्या स्थानिय महावितरण कार्यालयामध्ये जाऊन पॅनल दुरुस्तीसाठीचा अर्ज करावा.

दुरुस्ती व मदत कोणाकडून मिळते-

शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या कुसुम किंवा मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून बसवलेले सोलर पंपसेटची पाच वर्ष संबंधित कंपनीकडून देखभाल व दुरुस्ती केली जाते. त्यामुळे कंपन्याच दुरुस्ती करतात. शेतकऱ्यांला नुकसान झाल्याची माहिती व फोटोसह अर्ज सादर करावा लागणार आहे. महावितरण कंपनी त्याची पाहणी करते व संबंधित कंपनीकडून सेवा मिळवून देते असते.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती-

  • सोलर पॅनलचे नुकसान झाल्यास विलंब न करता लगेच तक्रार नोंदवावी.
  • पॅनलच्या स्थितीचे फोटो, पंप नंबर, युनिट नंबर यांसह तपशील अर्ज सादर करावा लागणार आहे.
  • महावितरणची मदत न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *