आता सातबारा, 8 अ उतारे व इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवरती मिळणार!

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागामार्फत क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सातबारा, 8 अ उतारे व इतर जमीन कागदपत्रे फक्त 15 रुपये शुल्कामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरती उपलब्ध होणार आहेत. महाभूमी पोर्टलद्वारे मोबाईल नंबर नोंदणी करून ही डिजिटल सेवा शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची त्याचबरोबर पैशाची बचत होणार आहे व होणाऱ्या फसवणुकीपासून आळा बसणार आहे. 15 जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यामध्ये पारदर्शक व सुरक्षित कागदपत्रे सेवा प्रदान करणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना आता जमिनीशी निगडीत कागदपत्रांसाठी महा-ई-सेवा केंद्रांवरती जाऊन रांगा लावण्याची गरज भासणार नाही. भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून सातबारा, 8 अ उतारे, फेरफार नोंदी व ई-रेकॉर्ड हे थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. ही सेवा फक्त 15 रुपयांच्या शुल्कामध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभुमी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे.

नोंदणीसाठी 50 रुपये शुल्क व जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक OTP द्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावरती सातबारा, 8अ व उतारे, फेरफार नोंदी व ई-रेकॉर्ड डिजिटल स्वरुपामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरती डाउनलोड करता येणार आहेत. त्याचबरोबर या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला आता लगेच सूचना मिळणार आहे. ज्यामुळे फसवणुकीला आळा बसणार आहे. तसेच, जमिनीशी संबंधित कायदे व प्रक्रियेबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन देखील मिळणार आहे.

ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळण्यात येणार आहे व कागदपत्रे अधिक सुरक्षित व विश्वासनीय असणार आहेत. ही सेवा 15 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे व 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना किफायतशीर व सुलभ मार्गाने कागदपत्रे मिळणार आहेत. तसेच त्यांच्या वेळेची व पैश्याची बचत होणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *