सध्या स्थितीला दहा रुपयांच्या वस्तू पासून ते लाखांच्या वस्तूपर्यंत एटीएमद्वारे पैसे देण्यात येतात. परंतु या एटीएमवरती ज्या सुविधा आहेत, त्याच्यापासून ग्राहक अज्ञान आहेत. तुमच्या खिशामध्ये असलेल्या एटीएमकार्डवरती लाखांचा विमा दिला जातो, हे ऐकून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डसोबत मोफत विमा संरक्षण देत असतात. जसे की अपघाती मृत्यू, खरेदी संरक्षण व विमान प्रवासातील अपघात संरक्षण विमा किती असेल व कोणत्या प्रकारचा असेल हे त्या बँकेच्या व डेबिट कार्डच्या प्रकारावरती अवलंबून असणार आहे.
अपघाती मृत्यू विमा-
काही डेबिट कार्डवर दिले जाणारे विमा संरक्षण वेगवेगळे असते. जे त्यांच्या कायदेशीर वारसाला आर्थिक मदत करत असते.
कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक-
प्रत्येक बँकेच्या डेबिट कार्डवर मिळणारे विमा संरक्षण वेगवेगळ्या प्रकारचे असते. विमा संरक्षण मिळवण्यासाठी काही अटी व नियम असतात. विमा संरक्षणाचा दावा करण्यासाठी तुम्हाला बँकेत दिलेल्या नियमानुसार कागदपत्रे लागतात.
खरेदी संरक्षण विमा-
काही डेबिट कार्डवरती तुम्ही केलेल्या खरेदीचे संरक्षण करण्यात येते, जसे की खरेदीनंतर काही दिवसांच्या आत वस्तू हरवल्यास किंवा खराब झाल्यास संरक्षण देण्यात येते.
किमान व्यवहाराची गरज-
अपघात होण्याअगोदर किमान 30 दिवस अगोदर कार्डचा वापर झालेला असणे अनिवार्य आहे. जरी फक्त बॅलन्स चेक केला असेल तरी क्लेम होतो.
कार्ड चोरी झाल्यास संरक्षण-
काही डेबिट कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास संरक्षण देत असतात. विमा संरक्षण मिळवण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन कार्डवर कोणता विमा संरक्षण उपलब्ध आहे, हे तपासावे.
ऑगस्ट 2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यामध्ये रुपे डेबिट कार्डधारकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण देण्यात येते. यासाठी एटीएमकार्डचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.