बांधकाम उद्योग हा देशाच्या आर्थिक उन्नतीचा पाया आहे. घरे, पूल, रस्ते, कार्यालये यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हातभार लावणाऱ्या बांधकाम कामगारांचे योगदान हे मोठे असते. परंतु ही कामे करताना त्यांना अपार कष्ट, असुरक्षितता व वृद्धावस्थेत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. हा विचार करून महाराष्ट्र शासनाने “बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजना” ही योजना चालू केलेली आहे.
बांधकाम कामगार पेन्शन योजना म्हणजे काय?-
भारतीय संसदेमध्ये 1996 मध्ये संमत झालेल्या “इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम” च्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांसाठी कल्याणकारी योजना तयार करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बैठकीमध्ये ठराव करून 2025 च्या मार्च महिन्यात “निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या योजनेचा मुख्य उद्देश वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना वृद्धावस्थेमध्ये स्थिर आर्थिक आधार मिळावा त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा व त्यांना सामाजिक सुरक्षा प्राप्त व्हावी हा आहे.
सदर योजनेची पात्रता-
- वय वर्ष साठ पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सलग किमान 10 वर्षे तो बांधकाम कामगार नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
- पती-पत्नी दोघेही कामगार असतील तर त्या दोघांना स्वतंत्र लाभ घेता येणार आहे.
- जर कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याचा/तिचा जोडीदाराला लाभस पात्र असणार आहे.
- ESI किंवा EPF चा लाभ घेणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
निवृत्तीवेतन रक्कम-
| नोंदणी कालावधी | वार्षिक निवृत्तीवेतन रक्कम |
| 10 वर्षे | रु.6,000(50%) |
| 15 वर्षे | रु.9,000(75%) |
| 20 वर्षे | रु.12,000(100%) |
सदर योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने या अधिकृत वेबसाईटवरती किंवा खालील शासन निर्णय डाऊनलोड करून त्यामधील “प्रपत्र-अ” पूर्णपणे भरायचे आहे.
- त्यानंतर अर्जासोबत आधार कार्ड, जन्मतारीख प्रमाणपत्र, बँक पासबुक ही कागदपत्रे जोडणे गरजेची आहेत.
- नंतर अर्ज हा स्थानिक जिल्हा कार्यालयामध्ये सादर करायचा आहे.
- जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तपासणी करून “प्रपत्र-ब व “प्रपत्र-क” तयार करतील.
- मान्यता मिळाल्यानंतर “पपत्र-ड” नुसार पेन्शन क्रमांक देण्यात येणार आहे.
वार्षिक तपासणी व जीवन प्रमाणपत्र-
- प्रत्येक नोव्हेंबर महिन्यामध्ये “प्रपत्र-इ” नुसार हयातीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
- योग्यवेळी प्रमाणपत्र सादर नाही केले तर पेन्शन थांबू शकते.
पेन्शन वितरण प्रक्रिया-
- प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित DBT प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन कामगारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
- जर वितरणामध्ये काही अडचण आली तर स्वतंत्र फाईल तयार करण्यात येईल व पुन्हा वितरण करण्यात येणार आहे.
निवृत्तीवेतन पेन्शन योजनेच्या माहितीचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

