अनेक कामगारांच्या मुख्य उपजिविकेचे साधन हे बांधकाम क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण, आरोग्य व सामाजिक सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यातंर्गत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येणाऱ्या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगारांसाठी “या” दोन सुधारित योजना-
1. सुरक्षा संच वाटप योजना-
या योजनेचा माध्यमातून बांधकाम कामगारांना त्यांच्या रोजच्या कामामध्ये लागणाऱ्या सुरक्षिततेच्या साधनांचे मोफत वाटप करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व सक्रिय स्थितीमध्ये असलेले कामगार यासाठी पात्र असणार आहेत.
सुरक्षा संचामध्ये येणाऱ्या वस्तू-
- सेफ्टी हार्नेस बेल्ट
- सेफ्टी शूज
- इअर प्लग
- मास्क
- रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
- हेल्मेट
- सेफ्टी गॉगल्स
- सेफ्टी ग्लोव्ह्ज
- मच्छरदाणी
- पाण्याची बाटली
- स्टील टिफिन डबा
- सौर टॉर्च
- ट्रॅव्हल किट बॅग
योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया-
- पात्र कामगारांनी प्राधिकृत कामगार अधिकारी या कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करावा.
- वस्तूंची निवड ही ई-निविदा प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत कंपन्यांकडून करण्यात येईल.
- वस्तूंची गुणवत्ता शासनमान्य प्रयोगशाळेतून तपासण्यात येणार आहे.
- जिल्हा कामगार सुविधा केंद्रमार्फत वितरण व तपासणी केली जाणार आहे.
2. अत्यावश्यक संच वाटप-
या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची मदत करून त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणे हा आहे. या योजनेच्या लाभास पात्र असणारा लाभार्थी हा नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार असावा.
अत्यावश्यक संचामधील वस्तू-
- पत्र्याची पेटी
- प्लास्टिक चटई
- धान्य साठवण्याची कोठी- 25 किलो व 22 किलो
- बेडशीट, चादर, ब्लॅंकेट
- साखर व चहा ठेवण्याचे SS डबे
- 18 लिटर क्षमतेचा वॉटर प्युरीफायर
योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया-
- कामगारांनी अर्ज सादर केल्यानंतर पात्रता पडताळणी करण्यात येणार आहे.
- वस्तूंची खरेदी व वितरण निविदा पध्दतीने केले जाणार आहे.
- वितरणाची खातरजमा व तपासणी जिल्हा अधिकारी व मंडळ करणार आहेत.
अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सुरक्षा संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

