“महाडीबीटी–शेतकरी योजना” पोर्टलच्या माध्यमातून सौरचलित फवारणी पंप या घटकासाठी 100% अनुदान देण्यात येते अशी माहिती समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या माहितीसाठी “या” घटकासाठी पोर्टलवर किती अनुदान देय आहे हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येतो. यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे सौर ऊर्जावर चालणारे फवारणी पंप. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी करण्यासाठी गरजेचे असणारे आधुनिक पंप दिले जातात व ते सौर उर्जेवरती चालतात.
यासाठी पोर्टलवरती जाऊन अधिकृतरित्या अर्ज करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी कार्ड बंधनकारक आहे.यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची निवड प्रक्रिया ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने सोडतसाठी ग्राह्य धरले जाते. सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाईलवरती निवड झाल्याचा मेसेज येतो.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- फार्मर आयडी
- आधार कार्ड
- शेतीसंबंधी कागदपत्रे
- बँक पासबुक
- इतर शासकीय ओळखपत्रे
नोट-
- अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

