पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये झालेले 6 बदल!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु 31 जुलै 2025 पर्यंत कधीही पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी 6 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे.

1. मोबाईल नंबर अपडेट-

आता शेतकऱ्यांना पोर्टलच्या माध्यमातून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. ‘Update Mobile Number’ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून ,आधारशी लिंक असलेला नवीन मोबाईल नंबर नोंदवता येणार आहे.

2. ऑनलाईन परतावा-

जर कोणी शेतकरी अपात्र असूनही या योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तर आता ऑनलाईन पैसे परत करता येणार आहेत. ‘Refund’ या पर्यायावरती क्लिक करून, आधार क्रमांक टाकून रक्कम परत करता येणार आहे.

3. स्वतःच्या इच्छेने लाभ सोडण्याचा पर्याय-

कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून पैसे नको असल्यास, ‘Voluntary Surrender of PM-KISAN Benefits’ या पर्यायावरती क्लिक करून लाभ सोडता येणार आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व त्यानंतर संमती द्यायची आहे व ओटीपीद्वारे पुष्टी करुन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

4. चुकून लाभ सोडलेल्यांना पुन्हा योजना सुरू करण्याचा पर्याय-

जर तुमच्याकडून चुकून ‘Voluntary Surrender’ या पर्यायावरती क्लिक झाले असेल तर आता तुम्हाला पुन्हा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी होता येणार आहे. ‘Voluntary Surrender Revocation’ या पर्यायावरती क्लिक करुन आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पुन्हा नोंदणी करता येणार आहे.

5. राज्य किंवा जिल्हा बदलता येणार-

‘State Transfer Request’ या पर्यायावर क्लिक करून ज्यांचा पत्ता चुकीचा नोंदवण्यात आलेला आहे अशा अपात्र लाभार्थ्यांना आपला पत्ता दुरुस्त करता येणार आहे. ही प्रक्रिया फक्त सातबारा उतारा अपलोड केल्यानंतरच पूर्ण होणार आहे. जर चालू तिमाहीचे पैसे प्रक्रियेमध्ये असतील तर पत्ता बदलण्याची प्रक्रिया त्या रकमेच्या वितरणानंतर होणार आहे.

6. हेल्पडेस्क पर्याय-

जर तुमचा हक्क अडकला असेल किंवा कोणत्याही तांत्रिक अडथळा येत असेल तर ‘helpdesk Query Form’ भरून तुम्ही पोर्टलवरून तक्रार नोंदवू शकता.

नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *