सातबारा उतारा हा खरा आहे की खोटा आहे? कसे ओळखावे.

जमीन खरेदी करत असताना बोगस सातबारा उतारा वापरून अनेक वेळा बँक कर्ज प्रकरणे ही समोर आलेली आहेत. जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये बोगस सातबारा वापरल्यांना अनेक अनेक जणांना जेलची हवा देखील खावी लागली आहे. जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल व तुमच्या समोर सादर केलेला सातबारा उतारा हा बोगस आहे की नाही? हे कसे ओळखायचे, आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही आहे की नाही हे पहावे. कारण कोणत्याही सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. त्यामुळे हा पहिला पर्याय 100% तपासून घ्यावा.

तसेच अलीकडे शासनाच्या माध्यमातून डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला जातो. या सातबाऱ्यावरती कुठेही तलाठ्याची सही दिसून येत नाही. परंतु या सातबाऱ्यावरती खाली एक सूचना दिलेली असते. त्यामध्ये गाव नमुना 7 व गाव नमुना 12 डिजिटल असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्यांची गरज भासत नाही, अशी सूचना आपल्याला दिसते. जर जमीन खरेदी करायच्या वेळी डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उताऱ्याची प्रिंट घेऊन कोणी तुमच्याकडे आले तर त्यावर खालच्या बाजूला ही सूचना दिलेली नसेल तर तो सातबारा उतारा 100 टक्के बनावटी असणार आहे.

सातबारा उतारा हा बोगस आहे की नाही, हे ओळखण्याचा दुसरा पर्याय म्हणजे त्यावरील क्यू आर कोड. शासनाने नव्याने जो डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामध्ये हा क्यू आर कोड आपल्याला दिसून येतो. हा कोड स्कॅन केल्यास आपल्याला संबंधित जमिनीच्या मालकीबाबत माहिती मिळते. त्यामुळे जर डिजिटल सातबारावर हा क्यू आर कोड नसेल तर तो सातबारा बनावटी आहे, असे समजून जावे. त्याचबरोबर बोगस सातबारा उतारा आहे की नाही हे ओळखण्याची तिसरी पद्धत म्हणजे एल जी डी कोड व ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो हे आहे. प्रत्येक नवीन डिजिटल सातबारा उताऱ्यावर कोड आपल्याला दिसतो तर सातबाराच्या सुरुवातीलाच आपल्याला एलजीडी कोड म्हणजेच लोकल गव्हर्मेंट दिरेक्टरी कोड हा दिसतो.

हा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे व तो गावच्या नावासमोर अधोरेखित करण्यात आलेला असतो. त्याशिवाय सातबारा उताऱ्यावरती महाराष्ट्र शासनाचा व महाभूमीचा लोगो आपल्याला दिसत असतो, तो तपासून घ्यावा. महाराष्ट्र शासन लोगो हा सगळ्यात वरच्या बाजूला देण्यात आलेला असतो. तर महाभूमीचा लोगो हा सातबाऱ्याच्या ठीक मध्यभागी देण्यात आलेला असतो. वरती देण्यात आलेल्या दोन्ही गोष्टी या अगदी सोप्या आहेत व या तुम्हाला सहज सातबारा उताऱ्यावरती पाहता येणार आहेत. यावरील तिन्ही गोष्टी आपण सातबारा उताऱ्यावर तपासून घेतल्या तर आपली जमीन खरेदी करताना होणारी फसवणूक यामुळे टाळता येणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *