सातबाऱ्यावरती ‘या’ शब्दाचा उल्लेख असणे बंधनकारक! नाही तर जमीन जप्त होऊ शकते?

जमीन खरेदी ही आयुष्यामध्ये एक फारच महत्त्वाची त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणूक असते. कोणतीही जमीन म्हणजेच शेती अथवा बिगर शेती जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर फक्त स्थान, किंमत किंवा दलालाच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवू नका. कधी कधी हे धोकादायक ठरते. अनेक वेळा भावी मालक जमीन खरेदीच्या कागदपत्रांकडे पुरेसे लक्ष नाही देत व त्यामुळे तो आर्थिक व कायदेशीर अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता असते. यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘सातबारा उताऱ्यावर असलेली ‘शर्त’ व ‘धारण प्रकार’ याकडे दुर्लक्ष करणे हे आहे.

सातबारा म्हणजे काय व तो का महत्त्वाचा असतो?-

सातबारा उतारा म्हणजे कोणत्याही जमिनीचा कायदेशीर हक्कांची नोंद असलेला अधिकृत दस्तऐवज असतो. यामध्ये जमिनीची मालकी, कोणाचा हक्क लागू आहे, जमीन कोणत्या हेतूसाठी वापरण्यात येते, त्याचबरोबर शासनाने काही अटी त्यासाठी घातलेल्या आहेत का? इत्यादी सर्व नोंदी यामध्ये असतात. या माहितीमधील थोडीशी चूकीही भविष्यात जमीन जप्ती, व्यवहार रद्द होणे किंवा न्यायालयीन कारवाईस कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.

जमिनीचे मुख्य प्रकार-

  • जुनी शर्तीची जमीन (वर्ग-1) –

खाजगी मालकीची ही जमीन असते. या जमिनीची शेतकऱ्याला कुठल्याही खाजगी परवानगीशिवाय विक्री अथवा खरेदी करता येते. त्याचबरोबर सातबाऱ्यावरती या जमिनीसाठी ‘खा’ असा उल्लेख करण्यात आलेला असतो.

  • नवीन शर्तीची जमीन (वर्ग-2) –

सरकारकडून ही जमीन वतन, इनाम किंवा पुनर्वसन योजनेतून मिळालेली असते. या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी महसूल विभागाची पूर्वलिखित परवानगी बंधनकारक असते. सातबाऱ्यावर यासाठी ‘शर्ट लागू’ अशा स्वरूपाची नोंद करण्यात आलेली असते.

  • शासकीय पट्टेदार जमिन-

ही जमीन फक्त वापरासाठी देण्यात येते. यामध्ये मालकी हक्क नसतो. कोणताही व्यवहार करताना यासाठी कडक अटी लागू असतात. परवानगीशिवाय या जमीनीचा व्यवहार केला तर जमीन शासन जप्त करते.

‘शर्त’ व ‘धारणप्रकार’ नोंद नसेल तर काय धोका असतो-

शासकीय अटी लक्षात न घेता व्यवहार केला तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. परवानगीशिवाय व्यवहार झाला तर जमीन शासनाकडे जप्त होण्याची शक्यता दाट असते. त्याचबरोबर विकत घेतली जमीन ही वैध मानली जात नाही. व्यवहारावरती बाजारभावाच्या टक्केवारीप्रमाणे ठरवण्यात आलेला कर हा शासनाला अदा करावा लागतो. त्याचबरोबर न्यायालयीन खटले यामुळे उभे राहतात.

जमीन खरेदी करताना या गोष्टींची तपासणी करावी?-

  • सातबाऱ्यामध्ये ‘शर्त’ व ‘धारणप्रकार’ स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत की नाहीत? हे पहावे.
  • जमीन कोणत्या प्रकारांमध्ये मोडते याची खात्री करून घ्यावी.
  • जर शासकीय अट असेल, तर महसूल अधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी मिळालेली आहे का? हे तपासावे.
  • विक्रेत्याजवळ सर्व वैध कागदपत्रे व पुरावे आहेत का? हे पहावे.
  • व्यवहार करण्याअगोदर जमीन दस्तऐवजांची कायदेशीर पडताळणी अनुभवी वकिलाकडून करून घ्यावी.

यासंदर्भात शंका असेल तर कोठे चौकशी करावी?-

तालुका तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक कार्यालय किंवा bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तपासू शकता.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *