जर तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने झाले असेल; तर ते लगेच अपडेट करून घ्या नाहीतर ‘या’ सुविधा होतील बंद!

जर तुमचे आधार कार्ड हे 10 वर्ष जुने असेल व तुम्ही ते दरम्यान कधीच अपडेट केले नसेल तर आज आपण सदर लेखातून तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. UIDAI च्या मार्फत अलिकडेच एक अधिसूचना जारी करण्यात आलेली होती. त्यामध्ये सर्व आधारधारकांना त्यांचे कागदपत्रे व बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. जर तुम्ही तुमचे आधार वेळेवर अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सरकारी सेवा त्याचबरोबर अनुदानाच्या सुविधा मिळणार नाहीत. UIDAI नुसार, आधार हा एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. जो सरकारी त्याचबरोबर गैर-सरकारी सेवांमध्ये तुमची ओळख म्हणून मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. म्हणून त्यामध्ये नोंदवलेली माहिती अचूक व अद्यावत असणे गरजेची आहे. विशेषतः

  • बायोमेट्रिक डेटा- फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅनिंग व तुमचा फोटो
  • डेमोग्राफिक डेटा- नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी (जर असेल तर)

जर आधार अपडेट केले नाही तर या सुविधा होतील बंद-

जर माहिती चुकीची असेल किंवा बायोमेट्रिक पडताळणी जर अयशस्वी झाली तर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या सेवांपासून वंचित रहावे लागणार आहे.

  • रेशन कार्डद्वारे धान्य मिळणे बंद होण्याची शक्यता आहे.
  • एलपीजी सबसिडी येणे बंद होण्याची शक्यता आहे.
  • बॅंक खात्यात डीबीटी ट्रान्सफर अयशस्वी होणार आहे.

आधार अपडेट करण्याची प्रक्रिया-

आधार अपडेट करण्याची प्रक्रिया ही ऐच्छिक आहे; परंतु ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यामुळे सर्व योजना त्याचबरोबर सेवांचे फायदे कोणत्याही व्यत्ययाशिवाय उपलब्ध होणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे सहजपणे आधार अपडेट करू शकता. जर तुमचा आधार बनवून 10 वर्षांहून अधिक काळ झाला असेल तर लवकरात लवकर कागदपत्रे तपासा व अपडेट करा.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *