लाडकी बहीण योजनेमधील ‘या’ महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 11 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. परंतु योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून 12000 रुपये देण्यात येतात. याचाच संदर्भ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडला गेलेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील जर एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी महासन्मान निधी व पीएम किसान या दोन्ही योजनेचे मिळून 12 हजार रुपयांचा लाभ घेत असेल, तर महाराष्ट्र शासनाच्या डीबीटी संदर्भाच्या धोरणानुसार थेट खात्यामध्ये रक्कम पाठवण्याची मर्यादा ही 18 हजार रुपये निश्चित केलेली आहे. त्यानुसार ज्या लाडक्या बहिणीन योजनेच्या लाभार्थी महिलांना पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 12 हजार रुपये मिळतात. त्यांना उर्वरित 6 हजार रुपयांची रक्कम ही 500 रुपये दर महिना अशी देण्यात येते. त्यामुळे पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींना दरमहा योजनेतून 500 रुपये देण्यात येतात. या संदर्भातील नियम योजनेच्या मूळ शासन निर्णयात देण्यात आलेला आहे.

किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतात?-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येते. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्यात आलेले आहेत, त्यांचे आकडेवारी जाहीर केलेली होती. पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या ही 774148 इतकी आहे व या लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपये देण्यात येतात. योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. योजनांच्या शासन निर्णयांमध्येच हे निकष होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येतो.

लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण किती रक्कम जमा झाली?-

मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 पासून सुरु केलेली होती. तेव्हापासून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा निधी वितरीत केला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना काही वेळा दोन महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आलेली आहे. महायुतीच्या घटकपक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली होती. निवडणुकीच्या त्या घोषनेची अंमलबजावणी महायुती सरकार कधी करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे मिळून 16,500 रुपये आत्तापर्यंत एकूण जमा करण्यात आलेले आहेत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *