काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार झालेले आहे: परंतु तरीही लॉगिन करायला अडचण निर्माण होत आहे?

विविध शासनाच्या योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड बनवलेले आहे कारण त्याशिवाय त्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक शेतकरी हे फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी व्यस्त आहेत. परंतु सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांना महाडीबीटी व इतर योजनांचा लाभ घेत असताना फार्मर आयडी कार्ड देऊनही अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे.

फार्मर आयडी कार्डची नोंदणी होणे व फार्मर आयडी पूर्णपणे तयार होते यामध्ये फरक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना सेंट्रल आयडी नावाचा फार्मर आयडी दिला जातो. परंतु यानंतरही अर्ज अप्रूव्हची प्रक्रिया शिल्लक असते. त्यामुळे नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड वापरता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला असा अडथळा येत असेल तर तुम्ही एकदा अ‍ॅग्रीस्टॅक या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहता येते.

  • आपली माहिती पुन्हा तपासण्यासाठी सर्वात अगोदर Agristack या वेबसाईटवर जायचे आहे.
  • त्यानंतर फार्मर या पर्यायासमोर क्लिक करून लॉगिन करायचे आहे.
  • त्यासाठी मोबाईल नंबर व पासवर्ड ओटीपीद्वारे देखील आपण लॉगिन करू शकता.
  • पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यासंदर्भात माहिती दिसून येईल. यात जर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय नसेल तर तो तुमचा नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. यामुळे ओटीपी येण्यासाठी अडचन निर्माण होते.
  • त्याचबरोबर व्ह्यू माय इन्फॉर्मेशन या पर्यायावरती क्लिक करून आपण आपली माहिती पाहू शकता.
  • त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, जमिनीची माहिती याबरोबरच इतर माहिती दिसेल. ती माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.
  • जर या माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर ती माहिती पुन्हा एकदा अपडेट करून घ्यायची आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *