शासनाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना सहभागी घ्यावा व यातून यशस्वी उद्योजक निर्माण व्हावे, या हेतूने योजनेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन सुधारणेनुसार स्वयंम रोजगार व उद्योग उभाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींना 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगार व उद्योगधंदा करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना संधी देणारी नवसंजीवनी ठरणार आहे.
या योजनेचा लाभा हजारो तरुणांना झालेला आहे. सध्याच्या काळातील वाढती सुशिक्षित युवक-युवतींची संख्या त्याचबरोबर रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेता शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या नवीन सुधारणांमुळे या योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योगांसाठी पूर्वीपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे बेरोजगारांना आता दिलासा मिळालेला आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील सुधारणा-
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये वयोमर्यादेची वाढ करून आता 18 वर्षांपूर्वी सर्व स्थानिक व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- सेवा उद्योग व कृषीपूरक उद्योग व्यवसायांसाठी आता 50 लाखापर्यंत तर उत्पादन उद्योगासाठी तब्बल 1 कोटीपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- खेळत्या भांडवलाची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे. सेवा उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के व उत्पादन उद्योगासाठी 40 टक्केपर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- या योजनेमध्ये नव्याने कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल ढाबा, होम स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीसाठी बोट इत्यादी व्यवसायांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे.
- शिक्षणाची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. आता 10 लाखारुपयांवरील उत्पन्न प्रकल्पासाठी आणि पाच लाखांवरील सेवा व कृषीपरक व्यवसायांसाठी शैक्षणिक मर्यादा ही फक्त 8वी पास आहे.
- व्यवसाय प्रशिक्षणासाठी निवासी किंवा ऑनलाईन निवडीचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

