मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर!

आज आपण सदर लेखातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर देण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाणे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोयाबीन बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यांच्यासाठी लॉटरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती निवड झाल्याचा संदेश पाठवण्यास सुरुवात झालेली आहे.

सोयाबीन बियाणे अनुदानाची लॉटरी यादी जाहीर-

मागील काही दिवसापासून या अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या लॉटरीची व निवड यादीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. कृषी विभागामार्फत ही लॉटरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत व योग्य पध्दतीने ऑनलाईन अर्ज केलेले होता, अशा शेतकऱ्यांचा या निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात आलेला आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन-

ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणासाठी अनुदानावर निवड झालेली आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या ‘MAHGOV’ या प्रणालीद्वारे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवरती SMS पाठवण्यात आलेले आहेत. या संदेशात “निवड झालेली आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपण आप्ल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. त्याचबरोबर आजपासून 5 दिवसांच्या आत बियाणे घटकांचा लाभ घ्यावा. नाही तर आपली निवड रद्द करण्यात येणार आहे. आपणास एकदाच बियाणे उचल करायची आहे. अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाणांची किंमत वसूल पात्र करावी लागणार आहे. ‘MAHGOV’ या अशा स्वरूपाचा मजकूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संदेशातील सूचनेनुसार  लगेच आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.

पाच दिवसांच्या आत बियाणे उचलणे बंधनकारक-

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संदेश मिळाल्यापासून फक्त 5 दिवसांच्या आत आपल्या वाट्याचे सोयाबीन बियाणे महाबीजच्या अधिकृत वितरकांकडून उचलून घेणे अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांनी या मुदतीत बियाणे उचलले नाही तर त्याची निवड रद्द करण्यात येणार आहे व ती संधी प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत कोणताही हलगर्जीपना न करता बियाणे प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य-

या बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले कारण सोयाबीनची वाढती मागणी व शासनाकडे उपलब्ध असलेल्या मर्यादेमुळे. यामध्ये “प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य” या तत्वाचा वापर करून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या गाव निहाय व तालुका निहाय याद्या संबंधित कृषी कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. या याद्यांमध्ये शेतकरी आपले नाव तपासू शकतात.

बियाणे मिळवण्यासाठी ही कागदपत्रेबरोबर ठेवण्याचे आवाहन-

या योजनेचा माध्यमातून एका शेतकऱ्याला त्याच्या अर्जाप्रमाणे व क्षेत्रानुसार जास्तीत जास्त 75 किलो पर्यंत सोयाबीन बियाणे 100% अनुदानावर देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील किंवा तालुक्यातील महाबीजच्या अधिकृत बियाणे वितरकांची माहिती कृषी कार्यालयामार्फत देण्यात येईल. बियाणे घेण्यासाठी जाताना शेतकऱ्यांनी आपल्या सोबत सातबारा उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड व कृषी अधिकाऱ्यांनी किंवा कृषी सहाय्यकाने सांगितलेले इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

यावर्षी बियाणे वितरणासाठी कोणत्याही टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही. थेट वितरकाकडून निवड झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या संदेशांमध्ये किंवा प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये त्यांचे नाव, त्यांनी किती क्षेत्रासाठी अर्ज केलेला आहे, त्यांना किती बियाणे मंजूर झालेले आहेत व त्यासाठी अंदाजे अनुदानाची रक्कम किती असणार आहे, याची सविस्तर माहिती दिला जात आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *