पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा.

देशभरातील लाखो शेतकऱ्यांना भारत सरकारच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. परंतु काही शेतकऱ्यांनी चुकीने किंवा गैरसमजाने “Voluntary Surrender” हा पर्याय निवडला व त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. ही एक मोठी समस्या निर्माण झाली होती. परंतु आता सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचा या चुकूमुळे हप्ता बंद झालेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर “Voluntary Surrender” हा पर्याय देण्यात आलेला. याचा अर्थ असा की जर शेतकऱ्याला स्वच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल किंवा या योजनेचा लाभ बंद करायचा असेल तर हा पर्याय देण्यात आलेला होता. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल अचूक माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून या पर्यायावर क्लिक झाले व त्यांचे खाते आपोआप बंद झाले. परिणामी पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे यामुळे बंद झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडून चुकून हा पर्याय निवडला गेला आहे, त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा हप्ता चालू करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती “Voluntary Surrender Revocation” हा नवीन पर्याय देण्यात आलेला आहे.

समस्या काय झाली?-

अनेक शेतकऱ्यांनी माहिती नसल्यामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे “Voluntary Surrender” या नावाचा पर्याय निवडला. काही प्रकरणांमध्ये ई-मित्र केंद्र, CSC सेंटर किंवा इंटरनेट कॅफेमध्ये कार्यरत व्यक्तींनी चुकीची माहिती दिल्यामुळे किंवा चुकून चुकीचा पर्याय निवडला गेलेल्या शेतकऱ्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले व पुढील हप्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाही.

हप्ते चालू करण्यासाठी काय करावे?-

  • सर्वात अगोदर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • त्यानंतर Farmers Corner च्या बॉक्समध्ये देण्यात आलेल्या “Voluntary Surrender Revocation” या पर्यायाची निवड करावी.
  • त्यानंतर पुढे Registration No. मध्ये नोंदणी क्रमांक किंवा आधार नंबर टाकावा व कॅप्चा कोड टाकून Get OTP या ठिकाणी क्लिक करावे.
  • आलेला ओटीपी खालील दिलेल्या बॉक्समध्ये टाकून Verify ओटीपी यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर संबंधित शेतकऱ्याची माहिती समोरच्या विंडोवरती दिसणार आहे.
  • त्याखाली एक स्वयंघोषणापत्र देण्यात आलेले आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. तसेच आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का ? त्याठिकाणी Yes या पर्यायाची निवड करावी.
  • त्यानंतर Proceed For E-KYC या पर्यायाची निवड करावी.
  • पुढील विंडोवरती अटी व शर्तीचे एक Page येईल. त्यावरती क्लिक करून Submit या बटनावर क्लिक करायचा आहे.
  • यानंतर पुन्हा आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपले खाते पुन्हा एकदा चालू झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती येणार आहे.
  • या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचे खाते बंद झालेले आहे, त्यांना पुन्हा एकदा चालू करण्याची संधी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *