अनेक कुटुंबांमधील मालमत्तेवरून होणारे वाद-विवाद कायदेशीर पातळीवर जाऊन पोहोचतात. मालमत्तेवरील वादविवाद हे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येच नाही तर मोठ्या कुटुंबांमध्ये ही दिसून येतात. अनेक लोकांना मालमत्तेच्या संबंधित कायद्यांची चांगली माहिती नसल्यामुळे हे वाद आणखी चिघळत जातात. परंतु आज आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत विवाहित बहिणीला भावाच्या मालमत्तेवर दावा करता येतो का? व कोणत्या परिस्थितीत बहीण भावाच्या सर्व मालमत्तेवर दावा करू शकते? या प्रश्नांची उत्तरे.
मुलीचा आई-वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार-
आपल्या देशात लग्न झाल्यानंतर मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटा देण्यात येत नाही: परंतु लग्नानंतर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मुली फक्त आपल्या पालकांच्या मालमत्तेवरच नाही तर त्यांच्या भावांच्या मालमत्तेवर देखील दावा करता येतो. त्याचबरोबर बहीण व मुलींना पालक तसेच वडीलोपार्जित संपत्तीमध्ये वाटा देण्याबाबत अनेक नियम व कायदे आहेत.
हा मालमत्तेशी संबंधित नियम तुम्हाला माहिती हवा-
या कायद्यानुसार पालकांना स्वतःच्या कमाईतून कमवलेली संपूर्ण मालमत्ता ही विवाहित मुलीला देता येते. त्याचबरोबर या परिस्थितीत त्यांचा मुलगा म्हणजेच मुलीचा भाव याला अक्षेप घेता येत नाही. परंतु वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत भाऊ व बहिणीचा वडिलांच्या मालमत्तेवर समान वाटा असतो.
बहिणीला भावाच्या मालमत्तेमध्ये कधी हक्क मिळेल?-
बहिणीचा भावाच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो. परंतु हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, 2005 नुसार काही विशेष स्थितीत बहिणीला भावाच्या मालवत्तेवर पूर्ण अधिकार मिळवता येतो. 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये सुधारणा करून मुलींना वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा मिळवण्याबाबत कायदेशीर अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु वडिलांनी स्वतःच्या पैशाने मालमत्ता खरेदी केली असेल तर ते आपल्या इच्छेनुसार त्याची कशीही वाटणी करु शकतात. 2005 च्या कायदा दुरुस्तीनंतर मुलीला सह-वारस/ उत्तराधिकारी म्हणजेच समान वारस मानण्यात यावे, असे अधिकार देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत मुलीच्या लग्नामुळे वडीलांच्या मालमत्तेवरचा तिचा अधिकार बदलत नाही.
लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी मुलगी न्यायालयामध्ये दाद मागू शकते. त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो व दावा खरा ठरला तर मुलीला वडिलांच्या मालमत्तेचा हक्क मिळतो. मुलींना वडीलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांइतकाच समान अधिकार देण्यात आलेला आहे. वडिलांनी स्वतः कमवलेल्या संपत्तीमध्ये वडिलांनी मृत्युपत्र तयार केलेले असेल तर त्यांच्या मर्जीनुसार संपत्तीचे विभागणी होते. मृत्युपत्रात नोंद केल्यानुसार मुलींना संपत्तीचा वाटा मिळतो, परंतु मृत्युपत्र झाले नसेल तर मुलींनाही मुलांइतकाच म्हणजे समान वाटा देण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

