महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025 नोंदणी काल 26 मे 2025 पासून सकाळी 11 वाजता अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली आहे. या अगोदर तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेत काही दिवसांचा विलंब झालेला आहे. परंतु आता जे विद्यार्थी 10 वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या अगोदर अकरावी प्रवेश प्रक्रिया ही 21 मे रोजी सुरू झाली होती. परंतु तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश घेताना अडचणी येत होती. त्यामुळे शिक्षण विभागाने संकेतस्थळ तात्पुरते बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
महत्वपूर्ण तारखा-
- नोंदणी कालावधी व अर्ज भरण्याचा कालावधी- 26 मे ते 3 जून 2025 (सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
- तात्पुरती गुणवत्ता यादी– 5 जून 2025
- हरकतव चुकीचे तपशील दुरुस्त करण्याची वेळ- 6 ते 7 जून 2025
- अंतिम पात्रता यादी व शून्य फेरी वाटप- 8 जून 2025
- पहिली वाटप यादी(CAP फेरी)- 10 जून 2025
- प्रवेश पुष्टीकरण व कागदपत्र अपलोड करण्याची मुदत- 11 ते 18 जून 2025
अर्ज कसा करावा?-
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरती जावे.
- त्यानंतर “Student Registration” या पर्यायावरती क्लिक करुन नवीन नोंदणी करावी.
- त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती, पालकांची माहिती व इतर तपशील भरावे.
- त्यानंतर दहावीचा निकाल अपलोड करायचा आहे.
- 10 कॉलेजांची पसंतीक्रमानुसार निवड करायची आहे.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्वात शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढावी.
नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
अकरावी वेळापत्रक 2025-26 PDF फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2025-26 प्रक्रिया माहिती पुस्तिका PDF फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.