चालू घडीला अनेक लोकांकडे पॅन कार्ड क्रमांक हा असतो. पॅन कार्ड हे एक सरकारी कागदपत्र आहे. याच्या मदतीने सरकारला तुमच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवता येते. यावरून तुमचे उत्पन्न व खर्च याचा अंदाज लावता येतो. याशिवाय सरकारने पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आता बंधनकारक केलेले आहे. पॅन कार्डच्या मदतीने तुम्हाला आता कर्ज देखील घेता येऊ शकते.
पॅन कार्डवरून कर्ज कसे घ्यावे-
- तुमच्याकडे पॅन कार्ड व आधार कार्ड असे दोन्ही कागदपत्र असणे गरजेचे आहे व दोन्ही कार्ड हे एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
- जर दोन्ही कार्ड लिंक असतील तर तुम्हाला 24 तासांच्या आत कर्ज मिळणार आहे.
- पॅन कार्ड नसेल तर पर्सनल लोन मिळणार नाही.
पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- ओळखपत्र: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
- पत्त्याचा पुरावा: वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र
- गेल्या 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मागच्या 2 किंवा 3 महिन्यांची पगार स्लिप किंवा फॉर्म 16.
तुमच्याकडे जर वरील कागदपत्रे असतील तर तुम्हाला कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या बँकेची माहिती गोळा करा. तुम्ही त्या बँकेच्या वेबसाईटवर भेट दिली की तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर पर्सनल लोनचा पर्याय देण्यात आलेला असतो. पर्सनल लोनच्या टॅबवर क्लिक केल्यावरती तुम्हाला काही तपशील विचारण्यात येईल. यानंतर तुमचा अर्ज बँकेत जाणार आहे. बँकेच्या पडताळणीनंतर ते तुमच्याशी संपर्क साधतील व तुम्हाला पुढील प्रक्रियेबाबत सांगण्यात येते.
या गोष्टी कर्ज घेण्याअगोदर लक्षात ठेवाव्यात-
कर्ज घेण्याअगोदर बँकेचा व्याजदर व ईएमआयबरोबर सर्व आवश्यक ती माहिती घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर याचा पश्चाताप होणार नाही. कारण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला किती महिन्यांचा ईएमआय व दरमहा किती रक्कम द्यायची आहे, हे सर्व माहिती तुमच्या सोयीनुसार ठरू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.