चालू घडीला आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्रं आहे. आधार कार्ड हे अनेक प्रकारच्या कामांसाठी त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहे. आधारकार्डच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक UIDAI शी लिंक असणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन काही आधार कार्डमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवण्यात येतो. त्याद्वारे तुमची ओळख निश्चित करण्यात येते. त्यामुळे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर नेहमी चालू ठेवावा. जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन सेवा वापरताना कोणतीही अडचण येणार नाही.
मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करता येतो का?-
जर तुम्ही नवीन नंबर घेतला असेल व तुम्हाला तो आधार कार्डशी नवीन नंबर लिंक करायचा असेल तर ते तुम्हाला सहज करता येते. अनेक जणांच्या मनात असा देखील प्रश्न येतो, की आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करता येतो का? तर तुम्ही आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करू शकत नाहीत. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रामध्ये जावे लागणार आहे.
मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट का होत नाही?-
जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल व तुम्हाला तो आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन प्रक्रियेचा वापर करावा लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव UIDAI ने मोबाईल नंबर अपडेट करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे तुमच्या आधार डेटाची सुरक्षा अधिक सुनिश्चित होते.
मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया?-
आधारकार्ड वरील मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया ही सोपी आहे. पण ती फक्त ऑफलाईनच करता येते.
- मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्याजवळ आधार नोंदणी केंद्रावर जावे लागणार आहे.
- तेथे गेल्यावरती तुम्हाला आधारमध्ये बदल करण्यासाठी करेक्शन फॉर्म भरावा लागणार आहे.
- हा फॉर्म भरून तुम्ही आधार कार्ड केंद्र चालकाकडे जमा द्यावा.
- त्यानंतर बायोमेट्रिक माहिती देऊन तुमच्या तपशिलाची पडताळणी करावी.
- यासाठी 50 रुपयांचा शुल्क आकारण्यात येईल.
- नंतर तुम्हाला एक पावती देण्यात येईल. त्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्या स्थिती तपासता येणार आहे..
- काही दिवसांमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक केला जाईल.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

