लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. लाडक्या बहीणींसाठी आणखी एक दिलासा बातमी समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने बँकेतून 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय घोषणा केली आहे?-
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहीणींसाठी नुकतीच एक महत्वाची घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे, की ज्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करायचा आहे, परंतु त्यांच्याकडे भांडवलाची सोय नाही. या महिलांना आता बँकेकडून 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कर्जाचा हप्ता सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरण्याचा विचार करत आहे. या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक हातभार मिळणार आहे. त्याचबरोबर कोणताही ताण न येता उद्योजकाच्या वाटेवर पाऊल ठेवता येणार आहे. 30 ते 40 हजार रुपयांचे भांडवल जर मिळाले तर महिलांना किरको व्यवसाय म्हणजे शिवणकाम, खाद्यपदार्थ उत्पादन, छोटी दुकाने व सौंदर्यप्रसाधन सेवा इ. अशा विविध स्वरूपात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
त्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील व स्वतःबरोबर आपल्या कुटुंबालाही आर्थिक दृष्ट्या सक्षम करू शकतील. राज्य सरकारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांशी चर्चा करत आहेत. काही सहकारी बँका व जिल्हा बँका यासाठी तयार झालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातही बँकांशी स्वतः मी चर्चा करणार आहे, असे ते म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून दरमहा जी रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाते, तीच रक्कम कर्जाच्या स्वरूपात वापरण्यात येणार आहे. यामुळे महिलांवरती कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न येता त्या आपला व्यवसाय सुरू करु शकणार आहेत. अर्थात या योजनेमुळे केवळ महिलांचाच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लागणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट सक्षम झाल्या तर त्या केवळ उपभोक्त राहत नाहीत तर उत्पन्न निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत बनणार आहेत. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातल्या महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत बोलताना अजित पवार असे म्हणाले, की काही वेळा या योजनेचा निधी थोडा मिळण्यास थोडा उशिर होतो. तेव्हा विरोधक याबाबत अफवा उठवतात की ही योजना बंद होणार आहे. परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तसेच यावर सध्या राज्य सरकारचा 45,000 कोटी रुपयांचा खर्च होत आहे व सरकार हे आर्थिक ओझे पिलवण्यास तयार आहे. शेती व महिलांच्या सक्षमीकरण ही दोन्ही क्षेत्रंसरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. महिलांना जर उद्योगासाठी कर्ज दिले तर ते शासनाने फेडले तर ते महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल ठरणार आहे. याचबरोबर अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी सकारात्मक घोषणा केलेली आहे.
शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?-
शेतकऱ्यांबद्दल बोलताना अजित पवार असे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीजबिलाचा भरणा सरकारच्या माध्यमातून भरला जातो. यासाठी दरमहा 20 हजार रुपये खर्च होतो. हा खर्चकमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हाव्या यासाठी सरकार सौर पॅनल बसवण्याचे काम करत आहे. ते म्हणाले की लवकर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा वीज पुरवठा मिळणार आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी जनतेला शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केलेले आहे. ते म्हणाले की, सरकार हे राज्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

