केंद्र शासनाने अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार मिळावा व त्यांचे प्राण वाचवावे यासाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आहेत. देशभरात अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींला या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात कॅशलेस उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत उपचार सुविधा दिली जाणार आहे. अपघात झालेल्या दिवसापासून सात दिवसांच्या उपचाराचे पैसे या योजनेच्या माध्यमातून देण्यत येणार आहेत. ही योजना सोमवारपासून म्हणजेच 5 मे 2025 पासून लागू केलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये या योजनेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली होती. अपघातातील जखमींसाठी केंद्र सरकार सुधारित योजना घेऊन येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले होते.
केंद्र सरकारची कॅशलेस उपचार योजना काय आहे?-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीन कामे करावी लागणार आहेत. यामध्ये पहिले म्हणजे अपघातानंतर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणार आहे. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जाहीर करेल. दुसरे म्हणजे अपघातानंतर 24 तासात पोलिसांना कळवावे लागणार आहे. अपघाताची संपूर्ण माहिती जखमीच्या प्रकृतीबद्दलची माहिती पोलिसांना सांगावी लागणार आहे व तिसरे म्हणजे जखमींची फाईल तयार करून घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये पोलीस रिपोर्ट व जखमीचे ओळखपत्र जमा करायचे आहे.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जखमी व्यक्तीला 1.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये अपघाताच्या दिवसापासून पुढील सात दिवसांमध्ये दीड लाख रुपयांचे मोफत उपचार त्या जखमी व्यक्तीला देण्यात येणार आहेत. जखमींना प्रवेशावेळी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. प्राथमिक उपचार मोफत देण्यात येणार आहेत. गंभीरित्या जखमी झाल्यास सर्जरीची सुविधा देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या सुविधा देखील मोफत मिळणार आहेत. उपचाराच्या वेळी देण्यात येणारी औषधे देखील मोफत देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने आधी घेतला हा निर्णय?-
केंद्र सरकारने ही योजना लागू करण्याअगोदरच महाराष्ट्र शासनाने अशीच योजना लागू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अपघातातील जखमींना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा राज्य सरकार मार्फत दिली जाते.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

