डिजिटल युगाच्या आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाने प्रशासनिक प्रक्रिया अधिक पारदर्शक, त्याचबरोबर वेगवान व नागरिकांना सोयस्कर बनवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहे. या उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे “नवीन शासन निर्णय(GR) पोर्टल” हा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक, शासकीय अधिकारी, संशोधक, पत्रकार व इतर संबंधित व्यक्ती शासनाच्या निर्णयांची अधिकृत माहिती सहजपणे मिळवता येणार आहे. नवीन शासन निर्णय पोर्टल हे फक्त तांत्रिक सुविधा नसून, हे प्रशासनाच्या पारदर्शकतेचे व उत्तरदायित्वाचे प्रतिक आहे.
प्रत्येक GR चा डिजिटल पत्ता व QR कोडद्वारे उपलब्धता ही लोकशाहीच्या दिशेने उचललेले आधुनिकतेचे एक पाऊल आहे. आता कोणत्याही नागरिकाला कार्यालयाची धावपळ न करता आपल्या मोबाईलवरून हवी ती माहिती मिळवता येणार आहे. शासन निर्णय पोर्टल व त्यात समाविष्ट करण्यात आलेले QR कोड स्कॅन सुविधा हे महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल यशाचे मोठे उदाहरण आहे. या प्रणालीच्या माध्यमातून माहिती सुलभ व सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ही सेवा शासनाच्या निर्णयप्रक्रियेत लोकसहभाग वाढवण्यास मोठा हातभार लावणारी आहे.
आता बारकोड स्कॅन करून मोबाईलमध्ये शासन निर्णय डाऊनलोड करता येणार!-
शासन निर्णयांमध्ये विविध विभागाकडून निर्गमित केलेले अधिकृत आदेश, धोरणात्मक निर्णय किंवा मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात. विविध शासकीय योजना, अनुदान, अधिकार, नियुक्त्या, खर्च मंजुरी इत्यादी बाबींसाठी हे निर्णय महत्त्वाचे असतात. पूर्वी हे GR कागदपत्री स्वरुपात विभागीय कार्यालयात उपलब्ध होते, परंतु आता शासन निर्णय पोर्टलमुळे ते एका क्लिकवरती उपलब्ध झालेले आहेत.
शासन निर्णय म्हणजे काय?-
शासन निर्णय म्हणजे शासनाच्या विविध विभागाकडून देण्यात येणारे अधिकृत आदेश किंवा धोरणात्मक निर्णय असतात. हे निर्णय विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, निधी वाटपासाठी, अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी किंवा नवीन धोरण राबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. या अगोदर या निर्णयाची माहिती संबंधित कार्यालयात उपलब्ध असायची परंतु आता शासन निर्णय पोर्टलमुळे ही माहिती सार्वजनिक व सुलभ झालेली आहे.
नवीन GR पोर्टलचे वैशिष्ट्ये-
- विभागानुसार GR सर्च- वापरकर्ते कोणत्याही विशिष्ट विभागाचे शासन निर्णय सहजपणे निवडू शकतात. उदा. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी.
- तारीख व संकेतांकानुसार शोध- विशिष्ट GR ची तारीख, GR क्रमांक किंवा विषय लक्षात असेल तर त्या आधारे ही शोध घेता येणार आहे.
- PDF स्वरूपात डाउनलोड सुविधा उपलब्ध- प्रत्येक GR दस्ताऐवज पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे व ते संग्रहित करता येणार आहे.
- नवीनतम GRs चे अपडेट्स- पोर्टलवर सातत्याने नवीन GRs अद्यावत करण्यात येतो. यामुळे नागरिकांना ताज्या निर्णयाची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.
- दुहेरी भाषा सुविधा– GR पोर्टल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे राज्यातील विविध भागातील नागरिकांना ताज्या निर्णयांची माहिती मिळणे सोपे होणार आहे.
- QR कोड सुविधा- QR कोड स्कॅन करून मोबाईलवर थेट जीआर मिळण्याची नवीन सुविधा सुरू झालेली आहे.
पोर्टल वापरण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर पोर्टल वापरण्यासाठी gr.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
- त्यानंतर View GR या पर्यायावरती क्लिक करावे.
- त्यातील ‘शासन निर्णय’ या विभागाची निवड करावी. त्याचबरोबर कालावधी, GR क्रमांक किंवा कीवर्ड टाकून शोधावे.
- पाहिजे असेल त्या GR वरती क्लिक करावे व PDF डाऊनलोड करावी.
QR कोड स्कॅन करून GR कसा डाऊनलोड करावा?-
महाराष्ट्र शासनाने आता अनेक GRs वरती QR कोड छापलेले आहेत. या कोडच्या मदतीने वापरकर्ते थेट त्या GR ची डिजिटल प्रत मोबाईलवरती मिळवू शकतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.
- QR कोड स्कॅन करून GR डाऊनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर QR स्कॅनर हे अॅप उघडावे किंवा जर कॅमेरा स्कॅनला सपोर्ट करत असेल तर कॅमेराचा वापर करावा.
- त्यानंतर पुढे GR समोरील Show QR या पर्यायावर क्लिक करावे व QR कोड स्कॅन करावा.
- तुमच्या मोबाईल स्क्रीनवर संबंधित GR ची लिंक उघडणार आहे. त्या लिंकवर क्लिक केले की तुम्हाला GR हा PDF स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहे.
- ही सुविधा विशेषत: ग्रामीण भागातील नागरिक, शिक्षक, सरकारी कर्मचारी यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण त्यांना कोणत्याही विभागामध्ये प्रत्यक्षरित्या जाण्याची गरज भासणार नाही.
- शासन निर्णय पोर्टलचा उपयोग कोणाला होतो?-
- नागरिक- यामुळे नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळवता येणार आहे.
- शिक्षण व शाळा- यामुळे शिक्षणविषयक GR शोधणे अगदी सोपे होणार आहे.
- शासकीय अधिकारी- यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना अंमलबजावण्यासाठी आवश्यक तो GR लगेच सापडणार आहे.
- पत्रकार व संशोधक- यामुळे पत्रकार व संशोधक यांना संदर्भासाठी अधिकृत GR सहजपणे उपलब्ध होणार आहे.
- विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे- यामुळे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना धोरणात्मक बदलांचा अभ्यास करता येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.