आज आपण सदर लेखातून महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पशुसंवर्धन योजना 2025 ही आता सुरू झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळी मेंढी वाटप, गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन अशा सर्व योजनांसाठी अर्ज करता येतो. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती.
सदर योजनेच्या सूचना-
- पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- अर्जदारांसाठी योजनेच्यामाध्यमातून अर्ज करण्याची मुदत दि.3-5-2025 ते 2-6-2025 पर्यंत राहणार आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी ah.mahabms.com या संकेतस्थळावरती जावे किंवा AH-MAHABMS हे मोबाईल ॲप वापरावे.
- AH-MAHABMS हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे.
- जर हे मोबाईल ॲप अगोदरच डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गुगल प्ले स्टोअरवरून पुन्हा एकदा नवीन ॲप डाऊनलोड करावे.
- दि.3-5-2025 ते 2-6-2025 या कालावधीमध्ये या अगोदर अर्ज न केलेल्या नवीन लाभार्थ्यांना फक्त नोंदणी व अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देखील देण्यात येणार आहे.
- अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. परंतु अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाली असेल तर त्यांना अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. परंतु ही सुविधा फक्त यावर्षी अर्ज करणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
- सन 2021-22, 2022-23 किंवा 2023-24 मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना या योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशी या योजनेच्या लाभास पात्र असणार आहेत.
- सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतीक्षाधीन यादी पुढील 5 वर्ष गाह्य धरली जाणार आहे. म्हणजे सन 2025-26 पर्यंत ही यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
- सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर सन 2022-23 पासून प्रत्येक वर्षी नवीन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्या अगोदरच्या प्रतीक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील जेष्ठता क्रमांक व उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. या अगोदर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही.
- या योजनेच्या माध्यमातून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी एसएमएस येणार आहे.
- या योजनेअंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थ्यांनी देणे बंधनकारक राहणार आहे.
- या योजने संदर्भातील अधिक माहितीसाठी योजनेचा तपशील व वेळापत्रक पहावे. तसेच 1962 या कॉल सेंटर क्रमांकावरती संपर्क करावा.
सदर योजनेचा अर्ज करण्याची पद्धत-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर ah.mahabms.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यातील अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती व अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरुन झाली की पुढे चला या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पुढील पेजवर आपली नोंदणी झालेली आहे व आपण योजनेसाठी अर्ज करू शकता या खालील पुढे चला या बटणावर क्लिक करायचे आहे.
- आता पुढील पेजवरती तुम्ही ज्या योजनासाठी पात्र आहात त्या योजना दिसतील. त्यातील तुम्हाला पाहिजे असेल ती योजना निवडायची आहे व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत व खालील पुढे चला या बटणावर क्लिक करायचे आहे.
- एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही. त्यामुळे जर माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करा या बटनावर क्लिक करावे व अर्ज भरताना अगोदर दिलेली माहितीची अंतिम सहमती झालेली असल्यास मला मान्य आहे या रकान्यामध्ये क्लिक करुन जतन करा या पर्यायावर क्लिक करावे.
- सर्वात शेवटी अर्ज सबमिट करायचा आहे.
- आता तुमच्या समोर प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती दिसेल.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

